Posts

Showing posts from July, 2023

‘भारतीय लोकशाही समोर आव्हाने"

Image
  ‘ भारतीय लोकशाही समोर आव्हाने" ‘ भारतीय लोकशाही समोर आव्हाने ‘ या विषयाची चर्चा करावीशी वाटणे याचा अर्थ ही आव्हाने आहेत हे उघड आहे . भारतीय राज्यघटना आणि त्यातील संसदीय लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाला आज ही आव्हाने जाणवत आहेत . भारतीय राज्यघटनेचा आणि राजकारणाचा लोकशाही हा केंद्रबिंदू आहे . आज लोकशाही मार्गाने निवडणुका होत असल्या तरी कारभार मात्र   हुकूमशाही आणि एकचालकानूवर्तीत्वाची जोपासना करणारा दिसत आहे . भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य , सार्वभौमत्व , संघराज्यीय एकात्मता , धर्मनिरपेक्षता , समाजवाद , लोकशाही ही मूलभूत तत्वे म्हणून सरनाम्यात समाविष्ट केली आहेत . मात्र या प्रत्येक मूल्याला आज तडे दिले जात आहेत . स्वातंत्र्याचा अर्थ स्व - तंत्र असा घेतला जातो आहे . आपले म्हणणे पुढे रेटत असताना दुसऱ्याच्या अधिकाराचा संकोच केला जात आहे . सार्वभौमत्वामध्ये अंतिम सत्ता लोकांची गृहीत आहे . मात्र लोकांना सत्तेऐवजी फक्त गृहीत धरले जात आहे . संघराज्यीय एकात्मता हे   तत्व केंद्र ...